Miraroad Cylinder Explosions: सिलिंडर स्फोटाने मिरारोड हादरले, घरांच्या काचा फुटल्या; एक जखमी

Miraroad Cylinder Explosions: रामकृपा या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात हॉटेलमध्ये काम करणारे काही कर्मचारी रहात होते. आज (गुरुवार) रात्री दहाच्या सुमारास या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
Miraroad Cylinder Explosions
Miraroad Cylinder Explosions

Miraroad Cylinder Explosions

भाईंदर: मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकजण जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रामकृपा या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात हॉटेलमध्ये काम करणारे काही कर्मचारी रहात होते. आज (गुरुवार) रात्री दहाच्या सुमारास या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एक सोळा ते सतरा वर्षीय मुलगा जखमी झाला. त्याला तातडीने नजीकच्या रुगणालयात दाखल करण्यात आले. (Miraroad Cylinder Explosions)

Miraroad Cylinder Explosions
Mumbai News : रस्ते कामांचा धुमधडाका; शहरातील काँक्रीटच्या रस्त्यांसाठी १३६२ कोटींचा खर्च

घरात आणखी काही गॅस सिलिंडरही सापडले आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. तसेच आसपासच्या घरांच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करून तिचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. (Latest Marathi News)

Miraroad Cylinder Explosions
Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल साडेआठ तास चौकशी, ‘ED’च्या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com