esakal | बंगालमधून पळून आलेली मुलगी तीन रात्र वाशी स्टेशनवर; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परतली
sakal

बोलून बातमी शोधा

बंगालमधून पळून आलेली मुलगी तीन रात्र वाशी स्टेशनवर; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परतली

तरुणीच्या पालकांनी वाशी पोलिस आणि स्वयंसेवी ट्रस्टचे  आभार मानले.

बंगालमधून पळून आलेली मुलगी तीन रात्र वाशी स्टेशनवर; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परतली

sakal_logo
By
गजानन चव्हाण


खारघर - रागाच्या भरात घर सोडून आलेली  सत्तावीस वर्षीय तरुणीला वाशी पोलिसांना तिच्या आई वडिलांकडे सुखरूप स्वाधीन केले. तरुणीच्या पालकांनी वाशी पोलिस आणि ट्रस्टचे  आभार मानले.  बेहरामपूर कोलकत्ता पश्चिम बंगाल येथून घरी आई वडिलांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता श्रेया मुजुमदार ही सत्तावीस वर्षीय तरुणी जवळपास चार दिवस वाशी रेल्वे स्थानकावर दिवस काढत होती. 26 डिसेंबरला रात्री अडीच्या सुमारास रात्र पाळीवर असलेले  वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या निदर्शनास आली.

राखोंडे यांनी तिला विश्वासात घेवून विचारणा केली असता. तिचे नाव श्रेया मुजुमदार असून  बेहरामपूर, कोलकत्ता येथून घरी न सांगताच आल्याचे सांगितले. तसेच मुंबई आणि नवी मुंबईत कोणीही नातेवाईक नसल्याचे समजले. पोलिसांनी तिला वाशी पोलीस ठाण्यात आणून पोलीस ठाण्यात नोंद करून खारघर मधील भार्गवी शंकर चारिटेबल ट्रस्ट मध्ये काही दिवस वास्तव्यास ठेवून  ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन आचारी आणि पोलीस उप निरीक्षक राखोंडे यांनी सदर महिलेच्या पालकांचा शोध घेतला असता सदर महिला ही पश्चिम बंगाल येथील  बारासात, चोवीस परगणा  येथून  आजीच्या घरून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याचे तसेच स्थानिक  बारासात पोलीस ठाण्यात श्रेया नावाची मुलगी  हरवल्या बाबत तक्रार नोंद करण्यात आल्याचे समजले. बारसात पोलीस ठाण्याच्या माध्यमातूम मुलीच्या आई वडिलाचा शोध घेऊन दोघांना नवी मुंबई येथे बोलावून आई वडिलांचे स्वाधीन केले.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सदर मुलगी आई वडिलांच्या ताब्यात दिल्यानंतर ते त्वरित रवाना झाले. आज गावी पोहचले असेल.-

 सोपान राखोंडे,
पोलीस उप निरीक्षक

सदर तरुणी  पोलिसांच्या सहमतीने आश्रम मध्ये 15 दिवस होती.आश्रम मध्ये कोणत्याही निराधार व्यक्ती कडून आर्थिक मदत घेतली जात नाही.सदर तरुणीस पोलिसांच्या उपस्थितीत आई वडिलांकडे स्वाधीन करण्यात आले.-

मधुसूदन आचार्य ,
भार्गवी शंकर चारिटेबल ट्रस्ट खारघर

Missing young woman in Bengal handed over to her parents BY KHARGHAR POLICE

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image