esakal | मिशन ब्रेक द चेन! नवी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोना विरोधात थोपटले दंड; 'ही' रणनिती तयार
sakal

बोलून बातमी शोधा

मिशन ब्रेक द चेन! नवी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोना विरोधात थोपटले दंड; 'ही' रणनिती तयार
  • कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचे
  • घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंग करणार

मिशन ब्रेक द चेन! नवी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोना विरोधात थोपटले दंड; 'ही' रणनिती तयार

sakal_logo
By
सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दंड थोपटले आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चैन' हे नवे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील हॉटस्पॉटमधील नागरीकांच्या घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंग आणि पाहणी केली जाणार आहे. 

हेही वाचा - दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालानंतर 'इथे' मिळणार गुणपत्रिका...

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधितांनी संख्येने 12 हजाराचा आकडा पार केला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करून अभिजीत बांगर यांची नियुक्ती केली आहे. बांगर यांनी शहराचा आढावा घेतल्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी मिशन ब्रेक द चैन  ही पहीलीच योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनुसार शहरात तयार करण्यात आलेले हॉटस्पॉटना केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. सद्या शहारात कोरोनाचे  42 हॉटस्पॉट आहेत. या हॉटस्पॉटमधील नागरीकांच्या घरोघरी जाण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमार्फत घरोघरी नागरीकांची मास स्क्रिनिंग केली जाणार आहे.

हाय रिस्क आणि लो रिस्कचे रुग्ण तयार होण्याआधीच संशयित रुग्णांना शोधण्याचे काम या मोहीमेद्वारे केले जाणार आहे. बांगर यांनी या मोहीम आखल्यानंतर बुधवारी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सर्व विभागाचे समन्वय अधिकारी, विभाग प्रमुख व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन संवाद साधून मिशन ब्रेक चैन मागील भूमिका समजावून सांगितली. तसेच या अभियानाचा चांगला प्रतिसाद दिसून आल्यास हे अभियान 31 जुलैनंतर ही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परिक्षांबाबत मंत्री अमित देशमुखांनी कुलगुरूंना दिल्या महत्वपुर्ण सूचना... वाचा

असे राबवणार मिशन ब्रेक द चैन
हॉटस्पॉटमधील कोनोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांचे स्क्रिनींग करून तात्काळ तपासण्या केल्या जाणार आहेत. 31 जुलै पर्यंत दहा दिवस सतत संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध घेऊन तपासण्या केल्या जाणार आहेत. संसर्गाची साखळी रोकण्यासाठी अॅन्टीजेन टेस्टची मदत घेतली जाणार आहे. संशयित रुग्णांची अॅन्टीजेन चाचणीद्वारे तात्काळ अहवाल पडताळून संशयित वाटल्यास त्याची रवानगी विलगीकरण केंद्रात केली जाणार आहे. 

 

मिशन ब्रेक द चैन या अभियानाअंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याकरीता हॉटस्पॉटमधील नागरीकांनी घरीच थांबून प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे आहे. 
अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

-----------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे