esakal | BMC : मिठी नदीच्या पुरावर उपाय, 'या' वर्षापर्यंत प्राथमिक अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

mithi river flood

BMC : मिठी नदीच्या पुरावर उपाय, 'या' वर्षापर्यंत प्राथमिक अभ्यास

sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विहार,तुळशी धरण भरल्यावर सांडव्याचे पाणी मिठी नदीत (Mithi River) नैसर्गिकरित्या वाहून येते. त्यामुळे मिठी नदीचा धोका अधिक वाढतो. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने (BMC) हे सांडव्याचे पाणी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राथमिक अभ्यास (First Study) 2022 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामला सुरवात होणार आहे. विहार तुळशी धरण भरल्यानंतर सांडव्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते. हा नैसर्गिक प्रवाह,त्यात जोरदार पावसाचे पाणी, नदीत येणारे सांडपाणी यामुळे नदीची पातळी (River Water Level) वाढलेली असतेच त्याचबरोबर समुद्राला भरती असल्याने खाडीतील पाणी थेट कुर्ल्याच्या नदी (Kurla River) पात्रत येते. त्यामुळे शिव,कुर्ला,कलिना,सांताक्रुझ या भागाला दरवर्षी फटका बसतो. महानगरपालिकेने 2020 च्या नोव्हेंबर पासून यासाठी सल्लागार नेमला आहे. पर्जन्यमानाचा अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे दोन वर्ष अभ्यासासाठी लागतील असे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ( Mithi River Flood BMC Solution First Study announces - nss91)

यावर उपाय म्हणून मिठी नदीत येणारे तलावातील सांडव्याचे पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.हा सल्लागार पुढील वर्षा पर्यंत अभ्यास करुन त्याचा अहवाल सादर करेल.त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात मिठी नदीने दोन वेळा धोक्‍याची पातळी ओलांडली होती.पहिल्या वेळेस तर समुद्राला भरती नसताना मिठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली होती.त्यामुळे कुर्ला क्रांतीनगर मधील 200 हून अधिक जणांना स्थालांतरीत करण्यता आले होते.

हेही वाचा: Mucormycosis : मुंबईत 56 % घट, रुग्णांंना कोट्यावधी रुपयांची इंजेक्शन्स

असा आहे अभ्यास सुरु

- मुंबईतील पर्जन्यमान.

-किती पाणी वळवावे लागणार.

- वातावरणातील बदलाचा मुंबईच्या पर्जन्यावर झालेला परीणाम

तीन पर्यांयाचा विचार

-पाणी जलबोगद्यातून ऐरोली खाडीत सोडणे

-जलबोगद्यातून सांडव्याचे पाणी शुध्दीकरण प्रकल्पात आणून प्रक्रिया करणे त्याचा पिण्यासाठी वापर

-होल्डींग पॉड बांधून एकाच वेळी नदीत जाणारे पाणी अडवणे.

तुळशी धरण भरल्यावर त्याचे सांडव्याचे पाणी विहार तलावात येते.विहार तलाव भरल्यावर सांडव्याचे पाणी नैसर्गिक रित्या मिठी नदीत मिसळते.ही दोन्ही तलाव जुलै महिन्याच्या 15 ते 20 दिवसात भरतात.त्यामुळे यानंतरच्या काळात मिठी नदीचा धोका अधिक वाढतो.पावसाच्या मोसमात किमान सात दिवस धरणाच्या सांडव्यातून किमान सात हजार दक्षलक्ष लिटर पाणी प्रत्येक दिवशी वाहून जाते.असा अंदाज आहे.मात्र,संपुर्ण अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध होऊ शकेल.असे सांगण्यात आले.

loading image