MPSC Exam 2020: ''ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे''

MPSC Exam 2020: ''ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे''

Published on

मुंबई: भाजप आमदार आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी आशिष शेलारांनी एमपीएससी परीक्षेवरुन झालेल्या गोंधळावर सरकारला सवाल केला आहे.  विद्यार्थ्यांचा जो मानसिक आणि शारिरीक छळ झाला त्याला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही आशिष शेलारांनी केला आहे. 

ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. आपत्ती व्यवस्थापनाला ते आधीच कळलं नाही. सचिव आणि मंत्री यांच्या काही जमत नाही आहे असं म्हणत आशिष शेलारांनी २१ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची सोय सरकारनं करावी, असंही म्हटलं आहे. 

MPSC ची परीक्षा २१ मार्चला होण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढले आहे. मात्र ठाकरे सरकार मधील भोंगळ कारभार आता उघड झाला आहे. याला नेमकं जबाबदार कोण आहे असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी आशिष शेलारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली आहे.  ट्विट करुन रोहित पवार यांनी नौटंकी केली. त्यांचं सरकार का ऐकत नाही?, असं शेलारांनी म्हटलं आहे. तसंच परीक्षा पुढे ढकलण्यामागे काही काळबैर होतं का?, असा सवालही शेलारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. 

आशिष शेलारांनी एमपीएससी परीक्षेचा मुद्दा मांडताना सरकारला आणखी एका मुद्द्यावरुनही धारेवर धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलंचं गाजत आहे. सचिन वाझे हे  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांची आता क्राईन्म ब्रान्चमधून बदलीही करण्यात आली आहे. यावरुनही आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

सचिन वाझेवर एवढं प्रेम ठाकरे सरकारचं का आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सचिन वाझेसाठी ठाकरे का वकिली करत आहे.  वाझे यांना सर्व काही माहित असताना त्यांच निलंबन केल जात नाही, असे काही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसंच मनसुख हिरेन यांच्या पत्नीला लवकरात लवकर संरक्षण देण्याची मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे.

mla Ashish Shelar criticizes Thackeray government over MPSC exams

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com