आमदार तटकरे अडकले 'शिवबंधनात'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मी कोणावरही नाराज नाही. मला राजकीय महत्त्वकांक्षा आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी शिवसेनेत आलेलो नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज (सोमवार) आपल्या हाती 'शिवबंध' बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. मला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडणार असल्याचे अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केले.

गेली काही दिवसांपासून कार्यकर्त्याशी पक्ष बदलाबाबत आपली चर्चा सुरू होती. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी एकदा चर्चा ही केली होती. यावेळी माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी काही सांगण्याच्या आधीच आपण पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो, असं अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केलं.

मी कोणावरही नाराज नाही. मला राजकीय महत्त्वकांक्षा आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी शिवसेनेत आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, ती आपण पार पडणार असून श्रीवर्धनमध्ये शिवसेनेविरोधात जो उमेदवार उभा राहील, त्याला कडवी झुंज देणार आहे. या सर्व प्रकाराबाबत आपले काका सुनील तटकरे यांच्याशी काहीही बोलणे झाले नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Avdhoot tatkare join Shivsena at Matoshree