लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शेट्टी का लढले नाहीत, याचा गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पाटील आणि शेट्टी यांनी वेळीच एकमेकांना रोखत पुढील चर्चा टाळली.
मुंबई : ‘माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली असती तर ते आज खासदार असते. शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) विरोधात आपली भूमिका लोकसभेत मांडली असती. पण ते माझे कधी ऐकत नाहीत’, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना लगावला.