esakal | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मनी लाॅड्रिंग प्रकरणात तात्पुरता दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

pratap sarnaik

आमदार प्रताप सरनाईक यांना मनी लाॅड्रिंग प्रकरणात तात्पुरता दिलासा

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : मनी लॅाड्रिंग प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर (Enforcement Directorate) असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) ता. 28 पर्यंत दिलासा मिळाला आहे. सरनाईक यांनी केलेल्या दोन्ही याचिकांवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरनाईक आणि त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांच्यासह निकटवर्तीय योगेश चंडेला यांनी उच्च न्यायालयात याचिका (Petetion in High Court) केली आहे. अमंलबजावणी संचालनालयाने टिटवाळा जमीन गैरव्यवहार (Titwala land scam)आणि एनएसईएल यामध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडिच्या या कारवाई विरोधात चौघांनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. (MLA Pratap Sarnaik gets some relief in money laundering case of Enforcement Directorate)

सुरक्षा रक्षकाच्या अन्य एका प्रकरणात सरनाईक यांना न्यायालयाने संरक्षण दिलेले आहे. त्या प्रकरणाची सुनावणीदेखील या याचिकेसह करण्याचे खंडपीठाने निश्चित केले आहे. त्यामुळे तो आदेश कायम ठेवत न्यायालयाने सर्व याचिकादारांना कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे. टिटवाळा जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमीनींच्या खरेदी विक्री बाबत आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा: ऑनलाईन सुनावणीला वकिलांनी गणवेश घालून हजर राहणं बंधनकारक - HC

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एन एस ई एल)

प्रकरणात चालू वर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सुमारे 5,500 कोटींचा सावकारी संबंधित आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. देशमुख सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत असे सांगितले जाते. सरनाईक यांच्या विहंग गृहनिर्माण कंपनीने एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. यासाठी टिटवाळामध्ये काही जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र, सुमारे बावीस कोटी रुपयांच्या या व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये देशमुख आणि सरनाईक यांच्या खात्यात पैसे वळविले असा आरोप केला जात आहे. ईडीने सन 2014 मध्ये भूखंड ताब्यात घेऊन सर्व व्यवहार थांबविले आहेत. मात्र आता हा भूखंड पुन्हा विक्रीला काढल्याचे उघड झाले आहे.

loading image