
डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पलावा पुल शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला आणि बंद देखील झाला. कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी हा पूल घाईघाईने सुरू करत विरोधकांवर टिका केली.