
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या यादीत मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये सर्व शाखांच्या एकूण 1,19,171 जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर अद्याप 75 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या यादीत मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये सर्व शाखांच्या एकूण 1,19,171 जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण 1,16, 80 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 45, 402 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सुमारे 70 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सहा हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. दुसऱ्या फेरीनंतर एक लाख 16 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. या फेरीआधी कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत वर्ग करण्यात येणार आहेत. यामुळे विशेष फेरीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्त्वाची बातमी : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात, आता 700 रुपयांत होणार चाचणी
महाविद्यालयांचे कट ऑफ वाढले
शहरातील काही नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ वाढल्याचे या गुणवत्ता यादीत दिसत आहे. एचआर महाविद्यालयाचा कट ऑफ दुसऱ्या गुणवत्ता यादीत 470 इतका होता तो तिसऱ्या गुणवत्ता यादीत 471 इतका झाला आहे. तर केसी महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ 449 इतका होता तो 451 इतका झाला आहे. तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये एका गुणाचाही फरक पडलेला नाही.
दुसऱ्या यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश
काही महत्त्वाच्या महाविद्यालयांचे दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ (500 पैकी गुण)
MMR region third cut of list declared 75 thousand still waiting for admission