Mumbai News : मेट्रो स्थानक रद्द नको स्थलांतरित करा स्थानिकांची मागणी; मुख्यमंत्र्याच्या निर्णयाकडे लक्ष

टाटा ब्लॉक, वांद्रे पश्चिम येथील रहिवाशांची प्रस्तावित मेट्रो २ब मार्गातील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानकाच्या आराखड्यात सुधारणा करावी
mmrda metro 2b national college metro station shift not to be cancelled mumbai
mmrda metro 2b national college metro station shift not to be cancelled mumbaiSakal

मुंबई : टाटा ब्लॉक, वांद्रे पश्चिम येथील रहिवाशांची प्रस्तावित मेट्रो २ब मार्गातील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानकाच्या आराखड्यात सुधारणा करावी अन्यथा हे स्थानक उद्यान परिसरातून स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

याबाबत स्थानिकांनी आमदार आशिष शेलार यांनाही पत्रव्यवहार केला होता. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने हे स्थानक रद्द करणार असल्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांना पत्राद्वारे दिली आहे.

'नॅशनल कॉलेज रोड' हे मेट्रो २बच्या विस्तारित मार्गाचा एक भाग आहे. हा मार्ग अंधेरी ते मंडालेपर्यंत विस्तारित आहे. हे स्थानक वांद्रे पश्चिम रेल्वे कॉलनीसमोरील मूळ नियोजित ठिकाणी हलवण्याची मागणी स्थानिक लोकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती.

mmrda metro 2b national college metro station shift not to be cancelled mumbai
Mumbai Local Drugs Video : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! मुलामुलींचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

रहिवाशांनी ही मागणी करताना साधू वासवानी उद्यानातील अनेक झाडे या प्रस्तावित मेट्रो स्थानकाच्या बांधणीत तोडली जातील असे नमूद केले होते. यामागणीसाठी अनेक आंदोलनेही झाली.

या आंदोलनाची दाखल स्थानिक आमदार आशिष शेलार यांनी घेऊन एमएमआरडीएला पत्र व्यवहार केला. साधू वासवानी उद्यानातील प्रस्तावित स्थानकाला होत असलेला विरोध पाहता स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या पत्रांना उत्तर देत हे स्थानक रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असल्याचे कळविले आहे.

mmrda metro 2b national college metro station shift not to be cancelled mumbai
Mumbai Local Drugs Video : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! मुलामुलींचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

मात्र हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर अंतिम होईल. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम चर्चेसाठी एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवला जाईल,” असे वांद्रे पश्चिमचे आमदार शेलार यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.

या पत्रानंतर नागरिक संभ्रमात

या पत्रानंतर स्थानिकांमध्ये दोन वेगवेगळी मत दिसून आली. साधू वासवानी उद्यानातील वृक्षतोड रोखवी आणि उद्यान राखले जावे म्हणून स्थानकाच्या मूळ आराखड्यात बदल करावा इतकीच मागणी आम्ही स्थानिकांनी घेतली होती. मात्र, एमएमआरडीएने स्थानकच रद्द करून आम्हा नागरिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मेट्रो ही नागरिकांच्या सुविधेसाठी आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा ही एमएमआरडीए प्रशासनाने विचार करावा. आम्हाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक राहिवाश्यांनी केली.

याबाबत, साधू वासवानीउद्यान बचाव आंदोलनात सहभागी नागरिकांशी संपर्क साधला असता. या निर्णयाबाबत एमएमआरडीएने अद्याप आम्हाला काहीही कळविले नसल्याची प्रतिक्रिया दिली.तसेच, एमएमआरडीएने आमदार महोदयांना पत्र पाठविले मात्र आम्ही स्थानिक जे यामागणीसाठी आंदोलन करत होतो त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असेही नमूद केले.

२४ तासांत बॅनर हटविले

मेट्रो स्थानक रद्द करण्यात येणार याबाबतचे पत्र मिळताच आमदार आशिष शेलार यांचे अभिनंदन करणारे बॅनर उभारण्यात आले होते. हे बॅनर २४ तासही न ठेवता काही तासांत उतरविण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com