esakal | काकांच्या मनसेकडून पुतण्याची पाठराखण, आदित्य ठाकरेंना पक्षाचा पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

काकांच्या मनसेकडून पुतण्याची पाठराखण, आदित्य ठाकरेंना पक्षाचा पाठिंबा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आदित्य यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.

काकांच्या मनसेकडून पुतण्याची पाठराखण, आदित्य ठाकरेंना पक्षाचा पाठिंबा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आदित्य यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. मनसेनं त्यांची बाजू घेतली आहे. ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशी काही गोष्ट झाली असेल असं मला वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

आता या प्रकरणी  चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. तसंच  भाजपमुळेच हा वाद निर्माण झाल्याचा आरोपही मनसेने केला आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली. ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही. भाजपच्या आरोपामुळेच हा वाद सुरू झाला आहे. सुशांतप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वांनीच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल, असं बाळ नांदगावकर म्हणालेत. 

अधिक वाचाः सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यपक्षपणे आरोप करण्यात येत होते. बिहार भाजपने तर थेट आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे.

हेही वाचाः Mumbai Rain: मुंबई- ठाण्यासह उपनगरात मुसळधार पाऊस, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

बाळा नांदगावकर गुरुवारी बेस्ट बील दरवाढी विरोधात शिष्टमंडळासह बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची भेट घेण्यासाठी कुलाबा येथील बेस्ट भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बाळा नांदगावकर आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली.

MNS bala nandgaonkar support aditya thackeray on sushant singh rajput case