"राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर" | MNS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर"

"राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर"

मुंबई: गुरू माँ कांचन गिरी (Kanchan giri) यांनी आज कृष्णकुंजवर येऊन मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची भेट घेतली. "आज ही भेट ठरवून घेतली. दोन्ही महाराज आले. हिंदूराष्ट्र (Hindu nation) हा अजेंडा होता" असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. "राज ठाकरेसारखा माणूस त्यांना हिंदुराष्ट्रासाठी योग्य वाटतो. मध्यंतरी राज ठाकरे आयोध्याला जाणार होते पण दुसरी लाट आली होती. आता ते लवकरच अयोध्येला जातील" असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

"अयोध्येच्या अखाड्यातून अनेक लोक बोलवत आहेत. आजोबा पणजोबांपासून हिंदुत्व राज ठाकरेंमध्ये भिनलेले आहे" असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. "राज ठाकरे कणखर हिंदुत्व मांडू शकतात राज ठाकरे यांनी आक्रमणपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे, अशी देशातून भावना आहे" असे नांदगावकर म्हणाले.

"उत्तर भरतीयांबाबत कोणतेच समज-गैरसमज नव्हते ते मीडियाने केले. राज्य विकासाला न्याय मिळावा ही एक भावना होती. 23 तारखेला मनसेचा भांडुपला मेळावा आहे. त्यात सगळी उत्तर मिळतील" असे नांदगावकर म्हणाले.

टॅग्स :mns