esakal | मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान

मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) एकत्र येणार का  याची. त्याला कारणंही तसेच आहे. सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपला झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर लगेच बाळा नांदगावकर यांनी 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते लवकरच पाहायला मिळेल' असं केलेलं विधान. यानंतर मुंबईतील परळ भागात महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट.

गेल्या काही दिवसात घडलेल्या या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीला कलाटणी मिळणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेचा मनात येत होता. यावर खुद्द देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजप नेत्यांकडून, 'मनसेने त्यांच्या विचारसरणीत बदल केले आणि त्या वेळची परिस्थिती पाहता निर्णय घेता येईल' असं विधान केलेलं समोर आलं. 

#SakalImpact - धडपड्या संतोषच्या पाठीवर मुख्यमंत्र्याची कौतुकाची थाप..

महाराष्ट्रातील राजकीय पटलावर गेल्या काही महिन्यात मोठे भूकंप आलेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली हातमिळवणी. यामुळे भाजपच्या हिंदुत्त्ववादी मित्राची मोकळी झालेली जागा महत्त्वाची मानली जाते. अशात महाराष्ट्रात हिंदुत्त्वाचा मुदा स्वीकारत राज ठाकरे यांचा मनसे राजकारण करू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं. आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आणखी एक मोठं विधान केलंय. या विधानामुळे मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन ? यावर आता उत्तर मिळताना दिसतंय. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात स्वबळावरच राजकारणात सक्रिय राहील असं बाळा नांदगावकर यांनी म्हंटलंय. मनसे भाजप सोबत जाणार नसल्याची कबुली बाळा नंदगावकार यांनी सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्ही या वृत्तवाहिनीही बोलताना दिली आहे.  

VIDEO - राष्ट्रवादीचे नेते मलिक यांची दादागिरी, रस्ते कामगारांना मारहाण..

राजकारणात कुणीही कुणाचाही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. आता सध्या जरी बाळा नांदगावकर यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरीही येत्या काळात भाजप मनसे सोबत जाताना पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.

MNS leader bala nadgaonkar on shaking hands with maharashtra BJP

loading image