महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही, मनसेचा सज्जड दम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली कात टाकत हिंदुत्वाच्या रुळांवरून वाटचाल करण्याचा निश्चय केलाय. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली जातेय. अनेक राजकारण्यांनी मनसे आणि राज ठाकरे यांना टार्गेट केलंय, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

अशातच प्रतिक्रिया आली ती MIM चे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून. इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'एन्टरटेनर' त्यांच्यावर निशाणा साधला. यावर आता मनसेकडून प्रत्युत्तर आलेलं पाहायला मिळतंय. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला, नाहीतर मनसे स्टाईलने इम्तियाज जलील यांना दणका दिला जाईल असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.   

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही, इम्तियाज जलील यांना चुकून लॉटरी लागली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. आमच्या अजिबात अंगावर येऊ नका, नाहीतर आम्ही शिंगावर घेऊ. एकदा प्रयत्न करून पहा मग तुम्हाला समजेल. राज ठाकरे यांना एन्टरटेनर म्हणत असाल तर   ओवेसी औरंगाबादला नाचले, त्यांना नाचा बोलायचं का ? हैद्राबादमधून आला आहात तर हैदराबादेत राहा. इथे नाटकं करायची नाहीत. MIM च्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राजसाहेबांबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. पुन्हा हि आगळीक झाली तर मनसेदणका निश्चित. तो दणका कसा असतो हे त्या अबू आझमीला विचारा. या शब्दात बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना खडेबोल सुनावले आहेत. 

MNS leader bala nandgaonkar on MIM leader imtiaz jalil 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader bala nandgaonkar on MIM leader imtiaz jalil