esakal | Vidhan Sabha 2019 : मनसेला मोठा धक्का; नांदगावकर शिवसेनेत
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : मनसेला मोठा धक्का; नांदगावकर शिवसेनेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नांदगावकरांच्या प्रवेशाने शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला आहे. मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस असलेल्या नितीन नांदगावकर यांनी नुकतेच टॅक्सीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होतात. 

Vidhan Sabha 2019 : मनसेला मोठा धक्का; नांदगावकर शिवसेनेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नांदगावकरांच्या प्रवेशाने शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला आहे. मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस असलेल्या नितीन नांदगावकर यांनी नुकतेच टॅक्सीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होतात. 

नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना मनसेच्या दुसऱ्या यादीतही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. वरूण सरदेसाई आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीने नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.