Raj Thackeray: 'ए गप्प रे'; राज ठाकरे पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर भडकले

 raj thackeray nashik
raj thackeray nashikSakal
Updated on

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. एमआयजी क्लब वांद्रे येथे पार पडलेल्या बैठकीत लोकसभा-विधानसभेच्या तयारीबाबत चर्चा झाल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी एका पत्रकाराने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी एक प्रश्न विचारु पाहिला. पण, 'ए गप्प रे' असं म्हणत राज ठाकरेंनी प्रश्न उडवून लावल्याचं पाहायला मिळालं. (mns leader raj thackeray angary over journalist question)

लोकसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी लागणार आहेत. त्यादृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक मुंबईत बोलावली. येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची काय रणनीती असेल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं राज यांनी सांगितलं. लोकसभेच्या तयारीसाठी मतदारसंघामध्ये नेत्यांना पाठवले जाणार आहे. सध्याचा राजकीय गोंधळ पाहता महानगरपालिकेच्या निवडणुका न लागण्याची शक्यता आहे, असं ठाकरे म्हणाले.

 raj thackeray nashik
Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा

येत्या काळात कोणासोबत युती करणार का? असा प्रश्व राज ठाकरे यांना पत्रकारांना विचारला होता. यावर राज म्हणाले की, परिस्थिती पाहून कोणासोबत जायचं आणि कोणा सोबत नाही हे ठरवलं जाईल. मागील काही वर्षात महाराष्ट्राने खूप काही पाहिलं आहे. कोण कोणासोबत जाईल याची खात्री देता येत नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही याची आता सवय झाली आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. राज्यात जो संभ्रम निर्माण झालाय तो दूर होईल अशी आशा आहे.

 raj thackeray nashik
Manipur Violence: मणिपूर विषयावर पंतप्रधान मोदींची भूमिका देशासाठी चिंतेची; शरद पवारांचे मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरुनही राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं. तुम्ही माझं ऐकत नाही. हे स्वत:चं आहे त्याचं. राष्ट्रवादीची एक टीम पुढे पाठवण्यात आली आहे. हे सगळे एकमेकांना आतून मिळालेले आहेत. हे आजचं नाही. २०१४ पासून हे सुरु आहे. पहाटेचा शपथविधी यासर्व गोष्टी आठवा तुम्हाला सगळं समजून जाईल. शरद पवारांना आणि अजित पवारांना भेटायला जागा 'चोरडीया' याठिकाणी मिळाली यावरुन कमालच म्हणाली लागेल, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com