
डोंबिवली - डोंबिवली मधील 65 बेकायदा बांधकामावर हातोडा फिरणार असल्याने हजारो नागरिक बेघर होणार आहेत. याप्रकरणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर आपला निशाणा साधला आहे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय मिळत आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या लोकांची भेट घेतली तर जास्त पुण्य मिळेल अशी टीका पाटील यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण व डोंबिवली हद्दीत महारेरा नोंदणी घोटाळ्यात 65 बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. यातील 47 इमारतीत रहिवासी पूर्ण क्षमतेने राहण्यास आहेत. ही बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत यामुळे या इमारतीतील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सुद्धा त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
एकीकडे रहिवाशांवर बेघर होण्याचे टांगटी तलवार आहे तर दुसरीकडे यामध्ये राजकारण देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे घटाने रहिवाशांची बाजू मांडत आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटाची देखील या रहिवाशांनी भेट घेतली आहे. कल्याण ग्रामीणचे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.
डोंबिवली, कल्याण ग्रामीण, दिवा परिसरात अनधिकृत बांधकाम उभारणारे, बनावट कागदपत्र तयार करणारे, लोकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय मिळत आहे असे म्हणत पाटील यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
ठाण्याचे पालकमंत्री आहात, नगरविकास मंत्री आहात, मुलगा येथील खासदार आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या राहिवाशांना येऊन भेटा जास्त पुण्य मिळेल असे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे. सेलेब्रिटीच्या घरी जायला वेळ आहे. मात्र 65 इमारती मधील राहिवाशाना भेटायला वेळ नाही.
विधानसभा निवडणुकीत संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी देत काम करायला लावले. रहिवाशांना मतदान करण्यासाठी धमकावले गेले. ही चैन जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही. यांचा आका ठाण्यात बसलाय. गॅंग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात आहे.
रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी आहे, त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू. मात्र याना दिलासा कसा देणार ? असा सवाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.