
डोंबिवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राज्यातून टिकेचे पडसाद उमटत आहेत. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'राष्ट्रीय पप्पू' असे राहुल यांना संबोधत त्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे.' अशी टिका त्यांनी केली आहे.
राज्यातील भारत जोडो यात्रे दरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केल्यानंतर आता मनसे पक्षाने देखील काँग्रेस नेते राहुल यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत राहुल यांना राष्ट्रीय पप्पू अशी उपमा देऊ केली आहे. सावरकरांचा अपमान हा संपूर्ण भारताचा हा अपमानआहे.
पण राष्ट्रीय पप्पू प सावरकर नावाची महती समजेल हे अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.भारत जोडो यात्रेवर देखील त्यांनी तोफ डागली असून 'भारत जोडो' हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे असे आमदारांनी म्हटले आहे.
काय आहे ट्विट
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे
केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. पण 'राष्ट्रीय पप्पू'ला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. 'भारत जोडो' हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे. #MNS
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.