esakal | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मंदिराचा टाळा उघडून केली पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मंदिराचा टाळा उघडून केली पूजा

sakal_logo
By
दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : मंदिरे उघडण्याबाबत उदासीन असणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी उल्हासनगरातील भाजपाने काही दिवसांपूर्वी भाजपने घंटानाद,शंखनाद केल्यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मंदिराचा टाळा उघडून पूजा अर्चना केली.याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी मनसेच्या 12 आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका केली.

दुपारी कॅम्प 1 च्या निळकंटेश्वर मंदिराचे टाळे उघडत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या मनसेने पूजा अर्चना केल्यावर घंटानादही केला बार रेस्टॉरंट ह्या मधूशालेची कवाडं 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू आहेत.असे असताना मंदिर खुली करण्यात राज्य सरकार उदासीन का? असा सवाल उपस्थित करतानाच मंदिरातून शंभर कोटींची वसुली होत नसल्याने मंदिर खुली करण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा: महापौरांविरोधात नितेश राणेंचे आरोप; पाहा व्हिडिओ

या आंदोलनात जिल्हा सचिव संजय घुगे,शहराध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोनवणे,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश सेठपलानी,सुभाष हटकर,विभाग अध्यक्ष योगाराज देशमुख,सागर चौहाण,अक्षय धोञे, सुहास बनसोडे,शाखा अध्यक्ष अमित सिंग, नविसेचे तन्मेश देशमुख,संजय शिंदे,सुरज बेंडके,हितेश मेहरा यांच्यासह मनसे व मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन कर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.

loading image
go to top