मी ब्ल्यू फिल्म करत नाहीः राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका पत्रकाराने ब्ल्यू प्रिंट ऐवजी ब्ल्यू फिल्म विषयी प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या शैलीतच मी ब्ल्यू फिल्म करत नसल्याचे उत्तर दिल्यामुळे सर्वांमध्ये हशा पिकला.

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका पत्रकाराने ब्ल्यू प्रिंट ऐवजी ब्ल्यू फिल्म विषयी प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या शैलीतच मी ब्ल्यू फिल्म करत नसल्याचे उत्तर दिल्यामुळे सर्वांमध्ये हशा पिकला.

मनसेच्या मेळाव्याचे आज (सोमवार) आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने ब्ल्यू प्रिंट ऐवजी ब्ल्यू फिल्म विषयी प्रश्न विचारला. ठाकरे यांनी तत्काळ मी ब्ल्यू फिल्म करत नसल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज यांनी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात राज यांनी दहा सभांमधून भूमिका घेतली होती. त्या वेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्‍याने खळबळ उडवून दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज काय भूमिका घेणार, ते मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे शंभरच्या आसपास जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत राज यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. राज हे सोमवारच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president Raj Thackeray says he does not do blue films