esakal | मनसेच्या सविनय आंदोलनाला सुरुवात, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास, अविनाश जाधव ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या सविनय आंदोलनाला सुरुवात, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास, अविनाश जाधव ताब्यात

सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय.

मनसेच्या सविनय आंदोलनाला सुरुवात, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास, अविनाश जाधव ताब्यात

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संदीप देशपांडे यांनी सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सभा सुरू करावी यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. 

ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.  मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती. सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास केला आहे. 

सविनय कायदेभंगाच्या इशाऱ्यानंतर संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं या नोटीसमध्ये लिहिलं आहे. मात्र तरीही संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवास केला.

याशिवाय नवी मुंबईत मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश वानखेडे यांच्या ऐरोली मनसे विभाग कार्यकर्त्यांनी वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास पूर्ण केला. यादरम्यान रबाळे पोलिसांनी ऐरोली स्थानकात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.  नालासोपाऱ्यात मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.  आज सकाळपासून वसई विरार नालासोपारा परिसरात रेल्वे स्टेशनला पोलिस छावणीचे स्वरूप दिसून आलं. 

MNS protest begins Sandeep Deshpande travel with local Avinash Jadhav custody