Dombivli News : विविध समस्या, मागण्यांकडे वेधले पालिकेचे लक्ष; कल्याण मध्ये मनसेचा धडक मोर्चा

कल्याण शहरातील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे, पाणी बिल लवकर मिळत नाही, उद्यानांची सफाई केली जात नाही
MNS protest in Kalyan highlights various problems demands
MNS protest in Kalyan highlights various problems demandsSakal

डोंबिवली - कल्याण शहरातील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे, पाणी बिल लवकर मिळत नाही, उद्यानांची सफाई केली जात नाही, रुक्मिणी बाई रुग्णालयात आयसीयू कक्ष उभारणे यांसारख्या अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धडक मोर्चा काढत पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात मनसे पक्ष सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कल्याण शहरातील टिटवाळा, मांडा, बल्यानी भागात अतिशय कमी दाबाने व गढुळ पाणी येत आहे. तसेच अधिकृत नळ जोडणी देण्यात येत नाही.

भाल, द्वारली, नांदिवली, विभागातील सोसायट्यांना अधिकृत पाणी जोडणी करून द्यावी. आणि अनाधिकृत नळ जोडणीमुळे सोसायट्यांना औद्योगिक विकास महामंडळांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये अनधिकृतपणे भरावे लागत आहे.

संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी बिल घरपोच वितरित होत नाही. नागरी सुविधा केंद्र दरमहा दोन टक्के दंड आकारते. तसेच नागरिकांना बिल काढण्यासाठी प्रत्येक बिलामागे 15 रुपये सुविधा केंद्रातून घेतले जातात.

ग्राहकांना नाहक भुर्दड का? कल्याणमधील उद्याने साफसफाई करण्याचे निविदा काढूनही गेले दोन महिन्यापासून सफाई बंद आहे तरीही साफसफाई चालु करावी. स्मशानभूमी येथे लाकडाचे पैसे दहनाच्या वेळेस घेतले जातात तीन ते चार महिन्यानंतर अर्ज करून पैसे परत मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात खेटे मारावे लागतात. त्यामुळे मुळात पैसे आकारण्याची गरज काय ?

महापालिकाच्या हद्दीतील जलकुंभातील निविदा मंजूर झालेली कामे त्वरित सुरु करावी. यांसारख्या अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून आमच्या मागण्या पूर्ण करा या मागणीसाठी गुरुवारी कल्याण मध्ये मनसेच्या वतीने केडीएमसीवर धडक मोर्चा काढला. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिका मुख्यालया बाहेरच ठिय्या आंदोलन केले गेले. काही वेळाने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी भेट देऊन मनसेच्या विविध 14 प्रमुख मागण्यात लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यानी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मनसे स्टाईलने पालिकेला सरळ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या वेळेस मनसे पदाधिकारी कडून देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com