"खड्डे बुजवले नाही तर या खड्ड्यात मत्स्यपालन करू"; पाण्यात होड्या सोडत मनसेची चेतावणी | Mumbai Road and MNS

मनसेने सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यात 'होडी' सोडत आंदोलन केलं आहे.
Mumbai Road and MNS
Mumbai Road and MNSSakal

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात होडी सोडून त्यांनी आंदोलन केले आहे.

अधिक माहितीनुसार, सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्याच्या पाण्यामध्ये 'होडी' सोडत मनसेने आंदोलन केलं आहे. मनसेच्या वाहतूक विभागाचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द टी जंक्शन येथे मनसेने हे अनोखे आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांना सरकारचा निषेध केला आहे.

Mumbai Road and MNS
छप्पर उडालेल्या बसचा Video Viral! महामंडळाकडून खुलासा; अभियंता निलंबित

दरम्यान, या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून मनसैनिकांनी या खड्ड्यात पालिका, एमएमआरडीए प्रशासनाचा जोरदार निषेध केला. प्रशासनाच्या नावाच्या होड्या बनवून या खड्ड्यात सोडण्यात आल्या आहेत. तसेच खड्डे बुजवले नाही तर या खड्ड्यात मत्स्यपालन व्यवसाय मनसे सुरू करेल अशी चेतावणी मनसेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलन सध्या चांगलंच चर्चेत आहे.

मुंबईत खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

मुंबईतील अनेक भागांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून यामुळे वाहने चालवण्यासाठी अडचणी येत असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. तर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. रस्त्यांच्या दुरूस्तीकडे महापालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com