राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी रवाना, राजकीय चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns raj thackeray visit chief minister eknath shinde at varsha bungalow for ganpati darshan

राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी रवाना, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. अमित ठाकरे आणि राजू पाटील हे देखील राज ठाकरे यांच्या सोबत वर्षा बंगल्यावर गणपती दर्शनासाठी रवाना झाले आहेत. चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांचे निवासस्थान 'शिवतीर्थ' येथे गणपती दर्शनाला गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना बाप्पाच्या दर्शनाचं निमंत्रण दिलं होतं. तसेच त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाली होती.

दरम्यान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणपती दर्शनाला येण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यानंतर आज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान वर्षा येथे जात आहेत. दरम्यान आगामी मुंबई महानगरापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. राज ठाकरे हे ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनाकरिता जात असून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या या होऊ घातलेल्या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान मागील दोन वर्षांपासून गणपती उत्सवावर कोरोनाचे संकट होते मात्र यंदा राज्यभरात गणोशोत्सवाची धूम सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. राज्यातील राजकीय गणिते मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात बदलल्याने नेतेमंडळीही एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत.

हेही वाचा: कमळ अन् धनुष्यबाण एकत्र येत BMC जिंकणार! फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Web Title: Mns Raj Thackeray Visit Chief Minister Eknath Shinde At Varsha Bungalow For Ganpati Darshan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..