esakal | राज Vs उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे Vsअमित ठाकरे, कारण आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

राज Vs उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे Vsअमित ठाकरे, कारण आहे...

राज Vs उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे Vsअमित ठाकरे, कारण आहे...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आपला १४वा वर्धापन दिवस साजरा करतेय. आज पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईबाहेर, म्हणजेच नवी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेतला. मनसेने आपला झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. या पार्श्वभूमीवर आजचा वर्धापन दिन मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिवस कार्यक्रम पार पडला.

आज पार पडलेल्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मनसेच्या बहुप्रतीक्षित 'शॅडो कॅबिनेट'ची घोषणा करण्यात आली. यामध्ये मनसेच्या अनेक नेत्यांकडे महाराष्ट्र विकास आघाडीतील कॅबिनेटमधील मंत्र्यांच्या कामावर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती...

शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे भाऊ भाऊ समोरासमोर येणार आहेत. याचं कारण म्हणजे शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेलं खातं. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खातं आहे. या खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात अमित ठाकरे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या कामाची स्तुती केली जाणार, का वाभाडे काढले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मोठी बातमी - असं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'शॅडो कॅबिनेट' ; वाचा संपूर्ण यादी

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने 'शॅडो कॅबिनेट'ची स्थापना केली आहे. यामध्ये मनसेचे महत्वाचे नेते अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांच्या समवेत अनेक मनसे नेत्यांचा समावेश आहे. 

MNS shadow cabinet amit thackeray will keep an eye on the work of aaditya thackeray