esakal | 'ब्लेम गेम मध्ये जनतेचाच गेम होतोय', मनसेचा निशाणा

बोलून बातमी शोधा

Mns chief raj thackeray
'ब्लेम गेम मध्ये जनतेचाच गेम होतोय', मनसेचा निशाणा
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लसीकरण वेगाने होणे आवश्यक आहे. पण केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याची राज्य सरकारची तक्रार आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक भागात लसीकरण केंद्र बंद आहेत. महाराष्ट्र सरकारची लसीकरण करण्याची पूर्ण तयारी आहे. पण लसीच उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांना लसीकरण केंद्रावरुन माघारी पाठवावे लागत आहे.

हेही वाचा: मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

केंद्राने राज्यांना लस उत्पादक कंपन्यांकडून लसी विकत घेण्याची परवानगी दिली आहे. पण सध्याच्या घडीला देशात लस उत्पादन करणाऱ्या फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांच्याकडे केंद्र सरकारने आगाऊ मागणी नोंदवून ठेवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात लगेच लसी मिळतील, याची शक्यता थोडी कमी वाटते. परदेशी कंपन्यांकडून सुद्धा थेट लसी विकत घेण्यासाठी बोलणी सुरु आहेत.

हेही वाचा: 'नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहील'

आजपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु झाले आहे. या वयोगटाच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राला १२ कोटी लसींच्या मात्रेची आवश्यकत आहे. राज्य सरकारने थेट एकरकमी चेकने इतक्या प्रमाणात लसी खरेदी करण्याची तयारी ठेवल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले.

ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लसीकरण हाच सध्याच्या घडीला एकमेव मार्ग आहे. लसीकरणावरुन केंद्र आणि राज्यामध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरुन आता मनसेने टि्वट करुन निशाणा साधला आहे. blame game मध्ये जनतेचाच game होतोय, असे मनसेने म्हटले आहे.