मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांंचा जामीन मंजूर;वाचा काय आहे प्रकरण

दीपक शेलार
Friday, 7 August 2020

मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी तब्बल सात दिवसांनंतर ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. 

 

ठाणे : मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी तब्बल सात दिवसांनंतर ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. 

क्या बात! अवघ्या 19 दिवसात 98 वर्षीय आजोबांनी कोरोनाला केलं 'बाय बाय' 

ठाण्यातील कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात अविनाश जाधव यांनी रुग्णालयाला भेट देऊन आंदोलन छेडले होते. याप्रकरणी, कापूरबावडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवून 31 जुलैला जाधव यांना अटक केली होती. जाधव यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी ठाण्याच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी वकील शिरोडकर यांनी जाधव यांच्यावर जनतेसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी राजकीय गुन्हे दाखल आहेत. तसेच, ते ठाण्यातच राहात असले तरी, साक्षीदारांवर कोणताही दबाव आणणार नाहीत, अशी हमी न्यायालयाला दिली. त्यानुसार, न्यायालयाने जाधव यांना 15 हजारांच्या व्यक्तीगत जात मुचलक्यावर मुक्तता केली.

कोंबडी बाजारात घुसला भलामोठा अजगर आणि घडलं असं की... 

दरम्यान, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोव्हिडच्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती पुढे देखील अशीच लढाई जनतेसाठी सुरू राहील, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Thane and Palghar district president Avinash Jadhav granted bail; what is the case?