अब्दुल शेख खूनप्रकरणी टोळक्‍यावर मोक्का; ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई

अब्दुल शेख खूनप्रकरणी टोळक्‍यावर मोक्का; ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई

मानखुर्द ः ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात मागील महिन्यात अब्दुल शेख (वय 29) याचा खून करण्यात आला होता. राशिद शेख, जाहिद सय्यद, जावेद शेख, मोहम्मद अली सय्यद, फैजलऊला शेख यांनी पूर्ववैमनस्यातून हा प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी अब्दुलच्या आत्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करून ट्रॉम्बे पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई केली. 

अब्दुलच्या खुनाचा तपास करत असताना राशिद शेखच्या टोळीविरोधात 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले. राशिद शेख याने इतर साथीदारांच्या मदतीने 2010 पासून चिता कॅम्पसह महाराष्ट्रनगर, मानखुर्द परिसरात दहशत निर्माण केली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी या टोळीविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. परिमंडळ सहाच्या उपायुक्तांनी शिफारशीसह सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देऊन पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तांनी भांडुपचे सहायक आयुक्त बाळासाहेब कदम यांच्याकडे तपास सोपवला होता. त्यांनी या पाच आरोपींसह तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या फरजाना सय्यद, आतिफ शेख, अली अय्याकणू शेख यांनाही अटक केली होती.

शबाना व शाकिब हे दोन आरोपी फरारी आहेत. मागील महिनाभरात मोक्कांतर्गत ही दुसरी कारवाई असून, त्यात 18 आरोपींविरोधात कारवाई केली आहे. त्यापैकी 13 आरोपी तुरुंगात आहेत; तर पाच फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. 

Mocca on Abdul Sheikh murder case Trombay police action

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com