''Well said, Doctor! डॉक्टरांच्या "त्या" कॅम्पेनचे मोदींकडून कौतुक!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी केलेल्या या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका डॉक्टरची पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केली आहे. मोदी यांनी या पोस्टला ''well
said doctor" असे म्हणत रिट्विट केले आहे.

मुंबई : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत युद्ध पातळी वर प्रयत्न सुरू आहेत. देशातील डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देताना दिसत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि प्रशासन नागरिकांसाठी देव बनून धावून येत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

दिल्लीतील सफरदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी देशातील
नागरिकांसाठी मोठे आवाहन केले आहे. त्यासंबधीच्या पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर केल्या आहेत. डॉक्टरांनी केलेल्या या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका डॉक्टरची पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केली आहे. मोदी यांनी या पोस्टला ''well
said doctor" असे म्हणत रिट्विट केले आहे. संपुर्ण देशभरात कोरोनाविषयी जनजागृती पाहायला मिळत असताना दिल्लीतील डॉक्टरांनी सुरू केलेल्या या कॅम्पेनला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  या पोस्ट/ट्विटमध्येमध्ये डॉक्टर एक पोस्टर हातात घेऊन उभे आहेत. त्यांच्या हातातील पोस्टरवर एक संदेश लिहिला आहे. तो सध्याच्या कोरोनाच्या आपत्कालिन परिस्थितीत खुपच
महत्वाचा ठरतो. या पोस्टरवर डॉक्टर लिहतात की, '' I stayed at work for you! you stay at home for us!".

या पोस्टरवर डॉक्टर लिहित आहे की, मी तुमच्यासाठी कामावरच थांबत आहे. तर, तुम्ही आमच्यासाठी घरीच थांबा!... कोरोनामुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शक्यतो घरी राहून तुमची कामे करा अशा सूचना वारंवार मिळत आहेत. हा संसर्ग थांबवण्यासाठी कमीत कमी लोकांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे
तुम्हाला काहीही आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास डॉक्टर्स तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेतच. परंतु तुम्ही संसर्ग रोखण्यासाठी घरीच थांबा असे आवाहन या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी शेअर केलेले हे पोस्टर समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या या कॅम्पेनचे नेटकरी कौतुकही करीत आहेत.

Modi praises the doctor's "that" campaign 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi praises the doctor's "that" campaign