esakal | अतिवृष्टीमुळे मोखाड्यात घरांची पडझड; सुदैवाने जीवितहानी टळली 
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rainfall tragedy

अतिवृष्टीमुळे मोखाड्यात घरांची पडझड; सुदैवाने जीवितहानी टळली 

sakal_logo
By
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

मोखाडा :  मोखाड्यात (mokhada) गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall) कोसळत आहे. त्यामुळे केवानाळे (kevnale) येथील पांडुरंग खाडे या आदिवासी मजुराच्या (tribal worker) घराची भिंत कोसळली (wall collapse) आहे. तर वाकडपाडा येथील महेश कान्हात यांच्या घरावर झाड कोसळून (Tree collapse) घराचे पत्रे फुटले आहेत. दोन्ही घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी (no casualties) झालेली नाही. 

हेही वाचा: जुन्या जागा मालकाची थकबाकी; नवीन ग्राहकाच्या खिशाला लावतेय कात्री

संपूर्ण पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मोखाड्यातही मुसळधार पावसाने गेली पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. सोमवारी  13 सप्टेंबर ला संध्याकाळी केवानाळे येथील पांडुरंग खाडे या आदिवासी मजुराच्या घराची भिंत या मुसळधार पावसाने कोसळली आहे. दरम्यान च्या काळात येथे कोणी नसल्याने जिवीतहानी झाली नाही. तर दुसर्या घटनेत वाकडपाडा येथील महेश कान्हात यांच्या घरावर झाड कोसळून घराचे पत्रे फुटले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मोखाडा पंचायत समितीचे शिवसेनेचे  सदस्य प्रदिप वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी करून ही बाब तहसीलदार वैभव पवार यांच्या यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करून आपत्ती ग्रस्तांना भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top