
मोखाडा : आदिवासी भागात वर्षातील सर्वात मोठा, होळी सणं साजरा केला जातो. हा सणं साजरा करण्यासाठी शेतकरी, शेतमजुर कुठेही असला तरी आपल्या गावाकडे पररतोच. या सणाला हलव्याचे दागिने ( हरडे ) यांना आदीवासी भागात विशेष महत्व आहे. अवघ्या तीन दिवसांवर होळीकोत्सव ( शिमगा ) येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील सर्वच बाजारपेठा हरड्या करड्यांनी सजल्या आहेत. मात्र, बाजारपेठेत मंदिचे सावट असल्याने दुकानदकरांना ग्राहकांची प्रतिक्षा आहे.