
मोखाडा : मोखाड्यात प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत एकमेव खरीपाचेच पीक घेतले जाते. या पीकाच्या ऊत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांना वर्षभर गुजराण करावी लागते. मात्र, याच लावणी केलेल्या भात पीकावर रानडुक्करांनी डल्ला मारून, शेतातील पीक ऊध्वस्त केले आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.