मोनो रेल एमआरव्हीसी चालवणार? 

संतोष मोरे
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - गेल्या वर्षी आगीच्या दुर्घटनेनंतर बंद पडलेली मोनो चालवण्यासाठी व तिचे व्यवस्थापन करण्यासाठी एमएमआरडीए योग्य व्यवस्थापनाच्या शोधात आहे. मोनो रेल चालवण्यासाठी एमएमआरडीएने भारतीय रेल्वेच्या मुंबई शहर रेल विकास महामंडळाकडे विचारणा केली आहे. यामुळे भविष्यात भारतीय रेल्वेची संस्था असलेली एमआरव्हीसी मोनो रेल चालवण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

देशातील पहिली मोनोरेल 2014 मध्ये चेंबूर ते वडाळा दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात सुरू झाली; मात्र सतत उद्‌भवणाऱ्या तांत्रिक अडचणी व आगीच्या घटनांमुळे मोनो नेहमीच चर्चेत राहिली. गेल्या वर्षभरापासून मोनो रेल चालवण्यासाठी एमएमआरडीए नवीन व्यवस्थापन कंपनी शोधत आहे. यापूर्वी एमएमआरडीएने मुंबईतील मोनोचे व्यवस्थापन करण्यासाठी व चालवण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे विचारणा केली होती. मात्र अद्याप त्यावर काही सकारात्मक चर्चा झाली नाही. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्यात फारसा रस दाखवला नाही, असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर 2017 मध्ये मोनोच्या रिकाम्या डब्यास लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मोनो सेवा बंद आहे. पहिला टप्पा सुरू केल्यावर वडाळा ते चेंबूर हा दुसरा टप्पा 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट होते; मात्र अद्याप ते पूर्ण होऊ शकलेले नाही. मोनो रेल 10 वर्षे चालवण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची निविदा भरलेल्या आयएल अँड एफएस कंपनीशीदेखील एमएमआरडीएची चर्चा सुरू होती. या महिनाभरात एमएमआरडीएने मोनो चालवण्यासाठी तब्बल चार व्यवस्थापनांशी चर्चा केली. 

मोनो रेलचे व्यवस्थापन व चालवण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबत एमएमआरडीएने आमच्याकडे विचारणा केली असून विशिष्ट नियम व अटीनुसार त्याचा विचार केला जाईल, असे मुंबई रेल विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराना यांनी म्हटले आहे. 

Web Title: Mono rail to run MRVC