मुंबईत कोरोनाचा उद्रेक; नव्या रुग्णांनी साडेपाच हजारांचा टप्पा गाठला!

Corona Patients
Corona PatientsSakal media

मुंबई : मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या (Mumbai corona patients) मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आज तर 5631 नवीन रुग्णांची (new corona patients) भर पडली. कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढल्याने चिंता वाढली आहे. मृत्यू मात्र नियंत्रणात (corona deaths) असून आज केवळ एका मृत्यूची नोंद झाली. (More than five thousand new corona patients found in Mumbai)

Corona Patients
राज्यात नव्या 4 ओमिक्रॉन रुग्णांची भर; मुंंबईत मात्र नोंद नाही

मुंबईत आज 5631 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 7,85,110 झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्या 3671 इतकी होती. त्याआधी हीच संख्या 2510 इतकी होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज आता वाढत असून दररोज 2 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. तर आज कोरोनामुळे केवळएका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांचा एकूण आकडा 16,375 वर पोचला आहे. 

बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील कमी असल्याचे दिसते. आज दिवसभरात 251 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 7,48,788 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 8060 इतकी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा दर हा 682 पर्यंत खाली आला आहे.

वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढण्यात आली आहे. आज  51,843 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 1,35,76,453 चाचण्या झाल्या आहेत. असे असले तरी ही रुग्णवाढ चिंताजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com