मोखाडा - पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या जव्हार आणि मोखाडा तालुक्यात, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा ऊपलब्ध झालेल्या नाहीत. आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे भयानवास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे..मोखाड्यातील कोलद्याचापाडा येथील आशा भुसारे (22-वर्ष ) गरोदर मातेला, प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची मनसुन्न करणारी घटना घडली आहे. अत्याधुनिक ऊपचार पध्दती ऊपलब्ध न झाल्याने, येथील आरोग्य प्रशासन हतबल झाले होते. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबीयाने केला आहे..मोखाडा तालुक्यापासून 15किमी अंतरावर असलेल्या मोऱ्हांडा ग्रामपंचायत मधील कोलदद्याचा पाडा येथील गरोदरमाता आशा नंदकुमार भुसारे (22-वर्ष ) हिला प्रसूतीसाठी 25 डिसेंबर ला पहाटे 3 : 00 वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यावेळी दिवसभर कोणताही उपचार न करता डिलिव्हरी पेशंटला इथून तिथून येजा करण्यास सांगितले, यानंतर आताच प्रसूती होईल, नंतर होईल यामध्ये दुसरा दिवस उलटला असल्याचे कुटूंबियांनी सांगितले आहे..त्यानंतर 26 डिसेंबर ला सकाळी 9 : 00 वाजेच्या दरम्यान प्रसूती होऊन या मातेने एका बालकाला जन्म दिला. परंतु यानंतर तिला प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. अक्षरश एक तास हे रक्तस्राव सुरु असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. त्यामुळे तीला पुढील उपचारासाठी जव्हारच्या ऊपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.तिथे चार रक्ताच्या बाटल्या तिला देण्यात आल्या, तरी देखील रक्तस्राव सुरूच होता. त्यामुळे आशा हिला पुढील उपचारासाठी, नाशिक च्या जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, प्रवासा दरम्यान अर्ध्यारस्त्यातच आशा भुसारेचा मृत्यू झाला आहे. मात्र, तिचे बाळ सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. .जिल्हा विभाजनाच्या दहा वर्षानंतर ही आरोग्याची हेळसांड.....आदिवासींना सर्वांगीण विकास व सर्व सुविधा ऊपलब्ध व्हाव्यात म्हणून सन 2014 मध्ये पालघर आदिवासी जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, दहा वर्षानंतर ही येथे जिल्हा शासकीय रूग्णालय ऊभारण्यात आलेले नाही. जव्हार कुटीर रूग्णालयाला, ऊपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळुन एक तप झाले आहे.मात्र, येथे कुठलीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. केवळ कागदावरच हे ऊपजिल्हा रूग्णालय राहिले आहे. सरकारी अनास्थेमुळे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर, आदिवासी भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्याने, आदिवासींना मृत्यू ला कवटाळावे लागते आहे..प्रतिक्रिया......माझ्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली, या नंतर डॉक्टर नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच रक्तस्राव झाला आहे. रक्तस्राव झाल्यानंतरही खूप विलंब लावला, वेळीच आमचे पेशंट सिव्हिल रुग्णालयात पोहचले असते तर वाचले असते. याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.- नंदकुमार भुसारे, (मृत मातेचे पती).प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे गरजेचे असते अन्यथा रक्तस्राव सुरु होतो या मातेची गर्भ पिशवी कडक न झाल्याने तिला रक्तस्राव सुरु झाला यावेळी रक्तस्राव थांबवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले तीला तात्काळ रक्ताच्या बॉटलही देण्यात आल्या परंतु तिचा रक्तस्राव थांबत नव्हता. यावेळी गर्भपिशवीचे ऑपरेशन करणे गर्भपिशवी काढून टाकणे ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात परंतु आपल्याकडे अद्यावत सुविधा नसल्याने नाशिक सिव्हिलला पाठवण्यात आले, परंतु तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. - डॉ. भरतकुमार महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णलाय..अती रक्तश्राव झाल्याने आशा भुसारे यांना रक्त देणे आवश्यक होते त्यामुळे तातडीने जव्हार येथील जव्हार येथील कुटीर रुग्णालयात पाठवून तिला रक्त दिले परंतु रक्तश्राव थांबत नसल्याने तिला पुढे नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.परंतु अती रक्तश्राव झाल्याने मध्यंतरीच तिचा मृत्यू झाला आहे.- डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.