सासूचे टोमणे वैवाहिक जीवनाचा भाग; मुंबई सत्र न्यायालयाचे निरिक्षण

सासूचे टोमणे वैवाहिक जीवनाचा भाग; मुंबई सत्र न्यायालयाचे निरिक्षण
Updated on

मुंबई - सासू-सासऱ्यांकडून टीका-टोमणे ऐकणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे. त्यासाठी त्यांना अटक करण्याची आवश्‍यकता नाही, असे मत मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणातील सासू सासऱ्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

एका सुनेने भादंवि 498 (अ) कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार केली. सासूचे वय 75 असून सासऱ्यांचे वय 80 आहे. या फिर्यादीमुळे त्यांना अटक होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला.
वैवाहिक जीवनात सासू-सासऱ्यांकडून हास्यविनोद आणि टीका टोमणे होतच असतात. हे सरसकट प्रत्येक कुटुंबात होते. त्यासाठी दोन्ही वयोवृद्ध अर्जदारांची पोलिस कोठडीची आवश्‍यकता नाही, असे निरीक्षण विशेष न्या. माधुरी बरालिया यांनी नोंदविले. या प्रकरणी त्यांच्या अटकेची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सुनेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच त्यांची बॅंक खातीही सील केली आहेत. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सुनेकडून करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला आणि जामीन मंजूर केला.

Mother in laws taunts are part of married life Inspection of Mumbai Sessions Court

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com