पिलाला लागला शॉक, माकडाची आई त्याला घेऊन पोहोचली दवाखान्यात..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

एखाद्या प्राण्याने किंवा माकडाने आपल्या पिलाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

हृदयाला चटका लाऊन जाणारी एक घटना नुकतीच घड्लीये. एका माकडाच्या पिलाला 11 KV हाय टेंशन विजेच्या  तारेचा झटका लागला आणि हे माकडाचं पिल्लू जमिनीवर कोसळलं. लहान माकड जमिनीवर पडलेलं पाहताच आसपासच्या  सगळ्या माकडांनी मोठमोठ्याने आवाज करण्यास सुरवात केली. हे पाहताच या माकडाची आई तत्काळ त्याठिकाणी पोहोचली आणि आपल्या पिलाला तिने उचलून घेतलं.

हे जिथे झालं तिथे जवळचं एक जनावरांचा दवाखाना होता. ही माकडीण आपल्या पिलाला घेऊन अनेक वेळ फिरत होती शेवटी ती या दवाखान्याच्या गेटवर येऊन बसली.  अनेकांनी हे दृश पाहिलं, आपल्या मोबाईल मध्ये ही घटना कैद केली, पण या पिलाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे सरसावत नव्हतं.   

प्राण्यांच्या दवाखान्यातील डॉक्टर्सना हा सगळा प्रकार लक्षात येताच हे डॉक्टर्स देखील दवाखान्या बाहेर आलेत आणि या पिलाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेत. एखाद्या प्राण्याने किंवा माकडाने आपल्या पिल्लाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल असं इथल्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे. 

आम्ही या आम्ही या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.  आम्ही या त्या माकडाच्या जवळ जाताच ही माकडीण अतिशय आक्रमक होत असल्याचंही  डॉक्टरांनी सांगितलंय. ही माकडीण खूप चिडल्यामुळे त्यावर  वेळेवर उपचार करता आले नाही.  नंतर या लहान माकडाची तपासणी केली असता हे पिल्लू मृत आढळलं. वेळेवर आसपासच्या लोकांनी या पिल्लाला प्राण्यांच्या दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित या लहान माकडाचे प्राण वाचले असते. सदर प्रकार मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये घडलाय. 

Webtitle : mother monkey reached hospital after baby monkey got shock of electric wire 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother monkey reached hospital after baby monkey got shock of electric wire