esakal | धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेस येताच आईने दोन वर्षाच्या मुलीसह मारली उडी
sakal

बोलून बातमी शोधा

railway track suicide

धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेस येताच आईने दोन वर्षाच्या मुलीसह मारली उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आईने पोटच्या मुलीसह आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आसनगाव रेल्वे स्थानकात (Asangaon Railway station) ही घटना घडली. आईने दोन वर्षांच्या चिमुकलीसब धावत्या एक्सप्रेससमोर (Tapovan Express) उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Mother with her daughter suicide at Asangaon railway station in front of Tapovan express)

"आसनगाव रेल्वे स्थानकात २८ वर्षीय महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री ही भयानक घटना घडली आहे. मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमोर या महिलेने मुलीसह उडी मारली. त्यामुळे आईसह मुलीचा मृत्यू झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. " अशी माहिती रविवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

loading image