
मुंबई : लोकलसह मेल एक्सप्रेस गाड्यावर काम करणारे मोटरमॅन, लोकल पायलेट आणि गार्डवर लक्ष ठेवण्यासाठी मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय़ घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा लागल्यानंतर मोटरमन आणि गार्डवर तानावात येण्याची आणि त्यांच्या गोपनीयतेवर हस्तक्षेप होण्याची भीती रेल्वे कर्मचारी संघटनेकडुन वर्तविण्यात आली आहे.
सध्या मुंबई विभागात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दिवसाला ३ हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात. मात्र अनेकदा मोटरमॅनकडून स्थानकातील थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना घडतच असतात. अशा घटनांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता असते.
अशा घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, पुरावे मिळावेत यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आत-बाहेर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरामुळे मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबद्दल रेल्वे कामगार संघटनानी चिंता व्यक्त केली आहे. तसेच सीसीटीव्हीमुळे कर्मचाऱ्यांवर तणाव येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात २५ सप्टेंबर २०२३ रोजी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत मोटरमन असणार आहे. या विषयावर अधिक चर्चा करून पुढील पावले उचलली जाणार आहे.
मोटरमॅन दोषी देऊन चालणार नाही-
अनेकदा सिग्नलमध्ये बिघाड असते तर अनेकदा इतर कारणांमुळे रेल्वेचे अपघातात घडतात. यामध्ये सर्वप्रथम कारवाई मोटरमनवर केली जाते. त्यामुळे मोटरमॅन आणि गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने मोटरमॅनवर होणारी कारवाई थांबणार का ? याचे उत्तर रेल्वेने अगोदर द्यावेत. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत.
अगोदरच मोटरमॅन आणि गार्ड वर्कलोडमध्ये तानावात असता. त्यात आणखी मोटरमॅनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने त्यांच्यावर तणाव कमी होण्याऐवजी वाढणार आहे. तसेच मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबद्दल सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सकाळला दिली आहे.
मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने मोटरमॅनवर तनाव येऊ शकतोय. यांसदर्भात आम्ही रेल्वे पत्र सुद्धा दिले आहे. तसेच सोमवारी सर्व मोटरमन सोबत बैठक होणार आहे. विषयावर अधिक चर्चा करून पुढील पावले उचलली जाणार आहे.
- विवेक सिसोदिया, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मुंबई विभाग
...असा होणार फायदा
मोटर मॅनच्या कॅबिनचा आता आणि लोकल समोर लावलेल्या कँमेरामुळे विविध हालचालीवर लक्ष असणार आहे. याच्या पहिला फायदा असा आहे की, धावत्या लोकलमधून रेल्वे रुळावर आणि रेल्वे रुळा शेजारी हालचालीवर नजर असणार , पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी भरल्यानंतर मोटर मॅनकडून लोकल चालविण्यासंबंधित मागोवा घेता येणार आहे. रेल्वे सिग्नल पाहण्यासाठी किंवा लोकलचा वेग मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठीही या कॅमेरा प्रभावी ठरेल.
३०० कॅमेरे लागणार -
मोटारमन, गार्डच्या हलचाली, केबीनमधील आणि बाहेरील परिस्थितीचे रियल टाईम चित्रिकरण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३०० कॅमेरे लागणार असून त्याचे रेकॉर्डिंग होणार आहे. भविष्यात एखादा अपघात घडल्यास त्याची चौकशी करताना सदर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून झालेल्या रेकॉडिंगचा उपयोग होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.