VIDEO : 'मोटरमन'साठी सजवली लोकल, बॅनरही लागला अन् फलाटावर सुरु झाला टाळ्यांचा कडकडाट, नेमकं काय घडलं?

मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांसाठी लोकलसेवा ही जीवनवाहिनी आहे.
Motorman Purushottam Central Railway
Motorman Purushottam Central Railwayesakal
Summary

अंबरनाथ स्थानकात ते लोकल घेऊन येताच फलाटावर उपस्थित प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या सेवेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

डोंबिवली : मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांसाठी लोकलसेवा ही जीवनवाहिनी आहे. याच जीवनवाहिनीचे सारस्य करणारे मोटरमन हेही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, ते फारसे प्रकाश झोतात कधी येत नाहीत.

लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहिल्यानंतर निवृत्तीच्या दिवशी त्याच लोकल प्रवाशांकडून मिळालेलं प्रेम पुरुषोत्तम यांच्यासाठी एक आगळी वेगळी भेट ठरलं आहे. मोटरमन पुरुषोत्तम (Motorman Purushottam) यांचा बुधवारी निवृत्तीचा दिवस होता. त्यासाठी अंबरनाथ - सीएसएमटी लोकल (Ambernath - CSMT Local) ही फुलांनी सजविण्यात आली होती, बॅनरही लागला.

Motorman Purushottam Central Railway
Kolhapur : पराभवाच्या भीतीनं 'त्यांच्या' पायाखालची वाळू सरकलीये; शिवसेना नेत्याचं सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

अंबरनाथ स्थानकात ते लोकल घेऊन येताच फलाटावर उपस्थित प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या सेवेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

मध्य रेल्वेचे (Central Railway) मोटरमन पुरुषोत्तम हे बुधवारी सेवेतून निवृत्त होत आहेत. नोकरीच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात त्यांची अंबरनाथ - सीएसएमटी लोकलनं होणार होती. त्यांच्या निवृत्तीसाठी अंबरनाथ लोकल फुलांनी, फुग्यांनी सजविण्यात आली होती. तसेच लोकलच्या पुढे त्यांच्या निवृत्तीनिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर ही लावण्यात आला होता.

Motorman Purushottam Central Railway
Nanded : संतोष बांगरांचं आगमन होताच लग्नातही घुमल्या 'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा, ठाकरे गट पुन्हा आक्रमक

सकाळी 8.27 मिनिटांनी अंबरनाथ स्थानकातून सीएसएमटीला जाण्यासाठी ही लोकल सुटते. अंबरनाथ यार्डातून रेल्वे स्थानकात लोकल घेऊन येत असताना फलाटावर उपस्थित प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचं स्वागत केलं. तसंच त्यांच्या सेवेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. काही प्रवाशांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com