मोटरमनने लोकल थांबवत वाचविले जखमी प्रवाशाचे प्राण 

मोटरमनने लोकल थांबवत वाचविले जखमी प्रवाशाचे प्राण 
Updated on

मुंबई : रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका तरुणाला मध्य रेल्वेच्या मोटरमनने चक्क लोकल थांबवून मदत केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी 9.40 वाजताची ही घटना असून मोटरमनने जखमी प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिल्याने जखमी प्रवाशाचे प्राण वाचू शकले आहेत. कर्त्यव्याच्या पुढे जाऊन प्रवाशाला मदत करणाऱ्या मोटरमनला मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. 

मुंबईतील लोकल सेवा कधी न थांबणारी सेवा आहे. मात्र, यातून शनिवारची घटना अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जलद मार्गावर अंबरनाथ-दादर लोकल धावत होती. दरम्यान मोटरमन प्रवीणकुमार कटियार यांना रेल्वे मार्गावर जखमी अवस्थेत प्रवासी दिसून आल्याने कटियार यांनी चक्क लोकल थांबवून त्याला वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी धाव घेतली. ही घटना सकाळी 9.40 वाजताच्या सुमारास घडली. 

कटियार हे लोकल चालवत असताना त्यांना जखमी तरुण दिसला दरम्यान त्याची हालचाल सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लोकलचा इमर्जन्सी ब्रेक लावत लोकल थांबवली. त्याचवेळी गार्ड आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणाला शेजारीच असलेल्या लोकलचा डब्यात ठेवले. तो पर्यंत या घटनेची माहिती कटियार यांनी उल्हासनगर स्टेशन मास्तरांना दिली. लोकल उल्हासनगर स्थानकामध्ये येताच लोकलमधून त्या तरुणाला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर प्राथमिक वैद्यकीय उपचार करुन त्याला पुढील उपचाराकरिता उल्हासनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या जखमी प्रवाशाचे नाव पंकज रॉय आहे. मोटर चालक प्रविनकुमार कटियार हे गेली 7 वर्षे मोटर चालक म्हणून काम करीत आहेत. आपण त्या तरुणाचे प्राण वाचवु शकलो यात खुप मोठे समाधान असल्याचे प्रविनकुमार कटियार यांनी सांगितले. 
कोट 

मोटरमन प्रविनकुमार कटियार यांनी तातडीने कारवाई करुन एका जखमी प्रवाशाचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याबदल त्यांना योग्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंर्पक अधिकारी, मध्य रेल्वे  

 
web title :The motorman stopped the locals and rescued the injured passenger

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com