MP Naresh Mhaske : खासदार फुटणार या खोट्या बातम्यांचे सूत्रधार 'उबाठा'चे नेते; नरेश म्हस्के यांचा आरोप

पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाठाने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत.
MP Naresh Mhaske

MP Naresh Mhaske

sakal

Updated on

ठाणे - एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी उबाठाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत असल्याचा आरोप शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचे वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com