मराठा आरक्षणाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावे; शिवसेनेची लेखी मागणी

समीर सुर्वे
Wednesday, 16 September 2020

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले  यांनी करावे.अशी लेखी मागणी शिवसेनेने केली आहे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले  यांनी करावे.अशी लेखी मागणी शिवसेनेने केली आहे .शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी आज दिल्ली येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे.या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

या लढ्यात सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत, खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन, मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून, या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी मागणी केली. तसेच याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष देऊन, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांच्या वतीने करण्यात आली.

औद्योगिक प्रकल्पाच्या हरकती मांडणार तरी कशा? व्हर्च्युअल जनसुनावणीत अनेक अडचणी

दरम्यान,  मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्षनेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Bhosale should lead the Maratha reservation movement