MPSC Exam 2026: राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित उच्चस्तरीय समितीचा; अंतरिम अहवाल शासनास सादर

MPSC Group C Exam 2026: महाराष्ट्रातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. गट-क परीक्षेतील पदसंख्या १६ हजारांवर नेणे, उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा सवलत आणि अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
A high-level committee recommends increasing MPSC Group C vacancies and granting one-year age relaxation.

A high-level committee recommends increasing MPSC Group C vacancies and granting one-year age relaxation.

esakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर 2026 अन्वये उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी व संबंधित हितधारकांशी केलेल्या सल्ला मसलतीदरम्यान प्राप्त मागण्या, सूचना व अभिप्रायांचा अभ्यास केला आहे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या व तातडीच्या मुद्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने समितीने अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे

Loading content, please wait...