MPSC विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर फडणवीसांची प्रतिक्रिया

MPSC विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर फडणवीसांची प्रतिक्रिया २४ वर्षांच्या स्वप्निलने राहत्या घरी घेतला गळफास MPSC student Swapnil Lonkar Suicide BJP Devendra Fadnavis Reaction
Fadanvis
Fadanvis

२४ वर्षांच्या स्वप्निलने राहत्या घरी घेतला गळफास

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्निल सुनील लोणकर या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन तारूण्यात स्वप्निलने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. (MPSC student Swapnil Lonkar Suicide BJP Devendra Fadnavis Reaction)

Fadanvis
तर हेच तरुण तुमच्या गळ्याला फास लावतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

स्वप्निलसारख्या धडधाकट आणि ऐन तारूण्यात असणाऱ्या मुलाच्या आत्महत्येबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. 'ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. एकूणच MPSC च्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे असं दिसतंय. अनेकांना पास होऊनही जागा मिळालेल्या नाही. अनेक जागा रिक्त राहिलेल्या आहेत. परीक्षा उशिरा होत असल्याचीही घटना घडलेली आहे. अशा परिस्थितीत MPSC ला स्वायत्तता हवी आहे हे खरं असलं तरीही त्यात स्वैराचार नसावा', अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Fadanvis
संजय राऊतांची धावाधाव; मुख्यमंत्र्यांनंतर घेतली पवारांची भेट

"मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी"; स्वप्निलच्या आईच्या संतप्त भावना

"आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का नाही? तसंच दुसऱ्यांच्या आई-वडिलांचाही विचार करा. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. स्वप्नील हुशार होता, त्यामुळे आम्ही त्याला शिकवलं. तो परीक्षा पासही झाला. पण, मुलाखत होत नसल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय सरकारला कळणार नाही की मुलगा जाण्याचं दु:ख काय असतं", अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com