म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक मृत्यू पालघरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis disease

म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक मृत्यू पालघरमध्ये

मुंबई : कोरोना काळात काळ्या बुरशीचा (म्युकरमायकोसिस) संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावला होता. नुकत्याच राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांत काळ्या बुरशीच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. यात मुंबईच्या शेजारच्या पालघर जिल्ह्यात काळ्या बुरशीच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण ४५.४५ टक्के एवढे आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये मृत्यू प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक होते. यात पालघर (४५.४५ टक्के), वाशीम (२६.६७ टक्के), रत्नागिरी (२५ टक्के), सातारा (२३.८८ टक्के), रायगड (२२.७३ टक्के), कोल्हापूर (२१.७५ टक्के) आणि जळगाव (२०.८६ टक्के) असे आघाडीचे जिल्हे आहेत. नोव्हेंबर २०२१पर्यंत ९,९६१ कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यापैकी १,३०० जणांचा मृत्यू झाला.