अँटिलीया स्फोटके प्रकरण : स्कॉर्पियो कार मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह आढळला खाडीत

अँटिलीया स्फोटके प्रकरण : स्कॉर्पियो कार मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह आढळला खाडीत

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईतून समोर येतेय. बातमी आहे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांशी संबंधित. बातमी आहे ज्या गाडीमध्ये ही स्फोटके सापडली होती त्या गाडी बाबत आणि गाडीच्या मालकाबाबत.

ज्या स्कॉर्पियो गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलाय. मनसुख हिरेन यांचा ठाण्यानजीकच्या मुंब्रा इथल्या रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कालपासून मनसुख हिरेन हे बेपत्ता असल्याची तक्रार मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती. दरम्यान मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेतीबंदर खाडीमध्ये आढळून आला आहे. 

दरम्यान याच मुद्द्यावर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या प्रश्नावर बोट ठेवलंय.   

अँटिलीया निवास्थानासमोर जी स्कॉर्पिओ सापडली या संदर्भातील संपूर्ण केस NIA ला ट्रान्स्फर झाली पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी केलेली आहे. या केसमध्ये अनेक योगायोग पाहायला मिळत आहेत.

मनसुख हिरेन यांच्या जबाबात त्यांनी गाडी बंद पडल्यानंतर ते ओला करून क्रॉफर्ड मार्केटला कामासाठी गेल्याचे म्हंटल होतं. मात्र दुसऱ्या दिवशी माझी गाडी गायब होती असा जबाब पोलिसांना दिला आहे. नेमके क्रॉफर्ड मार्केटला ते कुणाला भेटले हा महत्त्वाचा प्रश्न आहे असं फडणवीस म्हणालेत. 

ही गाडी जेंव्हा तिथे होती तेंव्हा लोकल पोलिस किंवा क्राईम तिथे पोहोचली नाही मात्र IO सचिन वाझे तिथे कसे पोहोचलेत? सोबतच CDR काढल्यावर अजूनही महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे जून २०२० मध्ये याचा गाडीमालकाशी सचिन वाझे यांचं बोलणं झालं होतं. गाडी मालक ठाण्यातील, IO ठाण्याचे, गाडी आली ती ठाण्यातून आली, त्यासोबत एक गाडी आली ती देखील ठाण्यातून आली असे अनेक योगायोग या केसबाबत आहेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ गंभीर नाही तर अत्यंत गुंतागुंतीचे आणि सर्वांसाठी चॅलेंजिंग झालेलं आहे असं फडणवीस म्हणालेत.

mukesh ambani explosives case owner of Scorpio car found ded near mumbra retibandar creek

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com