Mukesh Ambani: ओळख लपवण्यासाठी ड्रायव्हरनं केला 'या' वस्तूचा वापर

Mukesh Ambani: ओळख लपवण्यासाठी ड्रायव्हरनं केला 'या' वस्तूचा वापर

मुंबई: काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर  स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कार सोडणाऱ्या व्यक्तीविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. त्यातच आता अंबानी स्फोटक प्रकरणात स्कॉर्पिओ कार सोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इनोव्हा कारबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

मनसुख हिरेन यांची गाडी चोरून संशयितांनी त्यात स्फोटक ठेवून ती कार अंबानी यांच्या घराबाहेर लावली होती. इनोव्हा कारच्या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किटचा वापर केला होता. ही गाडी दोनदा मुंबईत येऊन घटनास्थळी दिसल्याचं स्पष्ट झालं आहे.  त्या इनोव्हाचा सध्या शोध सुरू आहे. मात्र अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरण 

ज्या दिवशी गाडी बंद पडली. त्या दिवशी हिरेनला सीएसटीला नेणाऱ्या ओला ड्रायव्हरचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. दिलेल्या लोकेशननुसार ओला घेऊन न जाता हिरेन ओलातून सीएसटीला उतरला, असं ड्रायव्हरनं आपल्या जबाबात म्हटलं आहे.

हिरेनने  दिलेल्या लोकेशननुसार जे.जे. फ्लायओव्हर उतरल्यानंतर राईट मारायचा होता. पण हिरेनने राइट न घेता चालकाला सरळ सीएसटीला टॅक्सी घेण्यास सांगत ते शिवाला हॉटेलजवळ उतरले.

हिरेन हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एटीएस  ने काल सचिन वझेंना बोलावलं होतं. या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी वझे काल दुपारी ATS अधिकाऱ्यांना भेटले.
या हत्या प्रकरणात ATS कडून वझेंना काही प्रश्न करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरूवातीपासून वझे हेच करत होते. तसेच वझेंनीच मनसुखचा जबाब नोंदवला होता.

Mukesh ambani house explosives case innova car driver used ppe kit

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com