Mumbai : सहा महिन्यांची मुदत असतांना सुरक्षा ठेव भरण्यासाठी तगादा का ?

वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचा महावितरणला सवाल
MSEDCL information
MSEDCL information sakal

मुंबई - नव्या वीजदर वाढीनुसार वीज ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेव रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असतानाही ती एकाच टप्प्यांत भरण्याचा आग्रह महावितरण लावत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने केली आहे. मुळात, वीज बिलांवरही स्पष्टपणे सहा महिन्यांत सुरक्षा ठेव रक्कम भरण्याबाबत उल्लेख आहे. तरीही,अशाप्रकारे वसुली का करता?, असा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी विचारला आहे.

नव्या आणि जुन्या वीज ग्राहकांना नव्या वीज दरानुसार सुरक्षा ठेव म्हणून ठराविक रक्कम महावितरणकडे ठेवावी लागते. दरात बदल झाल्यास या रक्कमेतही फरक होता. ग्राहकाने मागील वर्षांत वापरलेली वीज आणि नवे दर याच्या प्रमाणात ही रक्कम ठरवली जाते. त्यात आता वीज दरात वाढ करण्यात आल्याने सुरक्षा ठेवही वाढली आहे.

MSEDCL information
Mumbai : बनावट विम्याच्या माध्यमातून बँकेची फसवणूक

नियामक आयोगाच्या नियमानुसार, आता वर्षभरातील देयकाच्या सरासरी दोन महिन्यांन इतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाणार आहे. यासाठी आयोगाच्या नियमाप्रमाणे रकमेचा फरक हा सहा महिन्यांत भरायचा असतो. परंतू, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी एकदाच वसूल करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

यावर ग्राहक संघटनेने आक्षेप घेतला आहे. वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, "वेळेत बिल भरणाऱ्यांना ग्राहकांना एकाचवेळी ही रक्कम भरा, असे सांगितले जाते. त्यामुळे ग्राहक गोंधळात आहेत. याबाबतचा नियम तपासून संबंधित घटकांना योग्य सूचना कराव्यात. ज्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही आणि आर्थिक ताणही येणार नाही. सुरक्षा ठेव रक्कम भरण्याला कोणाचाही विरोध नाही. पण ती नियमांत राहून भरली जाईल," अशी माहितीही होगाडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com